संवाददाता ब्रिजेश बडगुजर:
शुक्रवार दि. २६ डिसेंबर २०२५ रोजी साईबाबा मंदिर २९ वा वर्धापनदिन स्वीस कॉउंटीजवळ,साईनाथ नगर,येरगाव येथिल सर्वाचे श्रध्दास्थान श्री साईनाथ महाराज यांच्या मंदिराचा २९ वा वर्धापनदिन सोहळा आयोजित केला होता,कार्यक्रमात महाआरोग्य शिवीर,रक्तदान शिबीर,ह.भ.प.श्री. महंत पुरूषोत्तम दादा पाटील (विश्वस्त :श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी,आळंदी देवाची) यांची किर्तनसेवा,श्री रामदेव बाबा भजनी मंडळ च्या वतिने साईबाबाच्या सुमधुर भजन गाण्यात आले.
वर्धापन दिनानिमित्त शालेय गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप करण्यात आली.