संवाददाता ब्रिजेश बडग़ुजर: बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांच्या वतीने लोणावळा सिंहगड इन्स्टिट्यूट येथे नवोदित वकील बंधू भगिनींसाठी चार दिवसीय दिं २३ ते २६ मे २०२४ पर्यंत निवासी अभ्यास शिबीरचे आयोजन करण्यात आले आहे, आज शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माननीय माधव जामदार साहेब यांच्या हस्ते चार दिवसीय अभ्यास शिबिराचे उद्घाटन करण्यात आले, प्रसंगी प्रमुख पुणे जिल्हा सत्र न्यायाधीश माननीय महेंद्र महाजन साहेब उपस्थित होते.पिंपरी चिंचवड ॲड. बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. रामराजे भोसले, सचिव ॲड. धनंजय कोकणे, मा सचिव ॲड. निखिल बोडके, ॲड. मंगेश खराबे यांच्या वतीने माननीय न्यायमूर्ती माधव जामदार साहेब, प्रमुख जिल्हा न्यायाधीश महाजन साहेब ,तसेच बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे नवनिर्वाचित अध्यक्ष ॲड. राजेंद्र उमाप सर यांचा सत्कार करण्यात आला ,सदर शिबिरात महाराष्ट्रभरातून अनेक नवोदित वकील बंधू भगिनी सहभाग नोंदविला आहे.या शिबिरात १ जुलै २०२४ पासून नव्याने लागू होणारे तीन कायदे त्यामध्ये भारतीय न्याय संहिता ,भारतीय नागरीक सुरक्षा ,भारतीय साक्ष अधिनियम या कायद्याची प्रमुख वक्त्यायांच्या वतीने नवोदितांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे,या शिबिराचे आयोजन बार कोन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे विधमान अध्यक्ष अँड राजेंद्र उमाप ,उपाध्यक्ष ॲड.उदय वारुंजीकर ,बार कोन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य ॲड.आशिष देशमुख, ॲड. संग्राम देसाई, ॲड.जयंत जायभावे यांच्यावतीने करण्यात आले होते, या शिबिरात बार कोन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे जवळपास सर्वच सदस्य त्यामध्ये उपस्थित होते.ॲड. पारिजात पांडे,ॲड.हर्षद निंबाळकर,ॲड.सुभाष घाडगे,ॲड.विवेकानंद घाडगे,ॲड.मोतिसिंह मोहटा,ॲड.वसंत साळुंके,ॲड.सतीश देशमुख,ॲड.असिफ कुरेशी व इतर सदस्य उपस्थित होते.
संबंधित खबरें
राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रोपदी मूर्मी यांच्या विजयाचे जोरदार स्वागत….
संवाददाता ब्रिजेश बडगुजर: आज “भारतीय जनता पार्टी” पिंपरी चिंचवड प्राधिकरण,चिंचवड स्टेशन मंडळाच्या वतीने निगडी येथील लोकमान्य टिळक चौकात राष्ट्रपतीपदी एन…
मावळ विधानसभा मा.राज्य मंत्री श्री बाळा भाऊ भेगडे यांचे समर्थक युवा नेते श्री धीरज नायडू यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला
संवाददाता ब्रिजेश बडगुजर: श्री धीरज नायडू यांच्या वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित वुक्षरोपण करणात आला व लाडली बहीण मुखमंत्री योजना ची शिबीर…
पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ – अंतिम उमेदवारांची यादी!
संवाददाता ब्रिजेश बडगुजर: प्रभाग क्रमांक १ अ जागा विजय गोविंद झरे – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) म्हेत्रे सुरेश रंगनाथ –…