संवाददाता ब्रिजेश बडगुजर: रविवार दिनांक 06 जुलै 2025 रोजी आषाढी एकादशीचा पवित्र दीन हा जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या नावाने पावन झालेल्या संत तुकाराम नगर मध्ये विविध कार्यक्रमाने यंदा आपल्या सर्वांच्या सहभागाने जल्लोषात साजरा होत आहे, शुभकार्यात आपण आपल्या परिवारासह सहभागी व्हावे अशी विनंती आहे !
या शुभ मुहूर्तावर दोन कार्यक्रम आपण आयोजित केले असून ते खालील प्रमाणे आहेत .
देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचे सरकारने यशस्वी अकरा वर्षे पूर्ण केले त्याबद्दल आचार्य अत्रे रंगमंदिर संत तुकाराम नगर येथे रविवार दिनांक 6 जुलै रोजी दुपारी तीन वाजता संकल्प सिद्धी 11 वर्षे अभिनंदन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. त्यामध्ये अकरा वर्षात झालेल्या विविध विकासातील कामकाजा बद्धलची माहिती देण्यात येणार आहे.!
या शुभमुहूर्तावर या कार्यक्रमात
संत तुकाराम नगर सहकारी गृह रचना संस्थेच्या 941 सदनिकाधारक व 22 दुकानदार सभासदांना शेअर सर्टिफिकेट वाटण्यात येणार आहेत.
आषाढी एकादशीच्या या पवित्र दिनी सर्व संत तुकाराम नगर हे साक्षात पंढरपूर होणार असून श्री. विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या जिवंत प्रतिकृतीचे मिरवणूक तसेच जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची पवित्र गाथा व श्री ज्ञानेश्वर माऊली यांची ज्ञानेश्वरी या ग्रंथांसह श्री विठ्ठलाच्या पादुकांची पालखी संत तुकाराम नगर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर, (एच ए मैदानातील पेट्रोल पंप समोरील, संत रोहिदास महाराज यांचे मंदिर शेजारी ) येथून शेकडे वारकऱ्यांसह,भजनी मंडळासह दुपारी 1:00 वाजता दिंडी निघणार आहे, महेश नगर, संत तुकाराम नगर, वल्लभ नगर मधील श्री दत्त मंदिर, श्री दक्षिण मुखी हनुमान मंदिर, श्री गणेश मंदिर, जगद्गुरु संत तुकाराम महाराज मंदिर,श्री.तुळजाभवानीमाता मंदिर, श्री खंडोबा मंदिर, श्री शनी मंदिर येथून आचार्य अत्रे रंगमंदिर येथे ही दिंडी पोहोचणार आहे, या भव्य दिंडीचे, पालखीचे तेथे मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात येणार आहे, दिंडीमध्ये सहभागी झालेल्या सर्व भजनी मंडळांचे यतोचित स्वागत झालेंनंतर त्यांच्या गौरव करण्यात येणार आहे.
आषाढी एकादशी दिवशी रविवारी दिनांक ०६ जुलै 2025 रोजी दुपारी तीन वाजता आचार्य अत्रे रंगमंदिर मध्ये हा सोहळा संपन्न होणार आहे तरी पिंपरी चिंचवड परिसरातील सर्वच भाविकांना निमंत्रण देण्यात येत आहे आपण आपल्या परिवारासह आषाढी कार्तिकी निमित्त होणाऱ्या प्रथम पवित्र सोहळ्यास सहभागी होऊन हरी भजनाचा लाभ घ्यावा व देशाप्रती देखील आपले प्रेम व्यक्त व्हावे याकरता या सर्व कार्यक्रमात सहभागी व्हावे अशी विनंती आहे.
कार्यक्रम संपल्यानंतर आचार्य अत्रे रंगमंदिर बेसमेंट मध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचा प्रसाद आपण सर्वांनी एकत्र गृहन करावयाचा आहे. कळावे ही विनंती.
मान्यवर उपस्थित मान्यवर पाहुणे
सौ माधुरी ताई मिसाळ नगर विकास राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य तसेच माननीय आ.ना.अण्णासाहेब बनसोडे उपाध्यक्ष विधानसभा महाराष्ट्र राज्य.
मान्यवर उपस्थिती व मार्गदर्शन
आमदार महेश दादा लांडगे
आमदार शंकर शेठ जगताप
आमदार अमितजी गोरखे
आमदार उमाताई खापरे
प्रमुख वक्ते मा. खा. अमरजी साबळे
कार्यक्रमाचे अध्यक्ष – शत्रुघ्नजी काटे अध्यक्ष भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा.
प्रमुख उपस्थिती
श्री सदाशिवराव खाडे प्रांत प्रतिनिधी भाजपा,सौ सुजाता ताई पलांडे महिला मोर्चा अध्यक्ष भाजपा,विजय उर्फ शीतल शिंदे,श्री विलास जी मडगिरी,ऍडव्होकेट मोरेश्वर शेडगे,संजय मंगुडकर,माऊली थोरात भाजपा,मंगेश धाडगे,महेंद्र बाविस्कर
इत्यादी पदाधिकारी या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.