काळेवाडीकरांच्या प्रश्नासाठी प्रशासनाला असाच घाम फोडणार संजय गायखे!

संवाददाता ब्रिजेश बडगुजर:

३१ डिसेंबर २०२५: पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या रिगणात उतरताना नामनिर्देशन अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी प्रहर पक्षाचे नेते संजय गायखे यांनी कष्टकरी शेतकऱ्यांच्या वेशभूषेत हजेरी लावली. साध्या धोतर-कुत्र्यात, डोक्यावर पगड़ी घालून आणि हातात शेतकऱ्यांच्या वरथरत्या हातांचे प्रतीक म्हणून ५ हजार रुपयांची अनामत रक्कम चिल्लर नाण्यांत भरून त्यांनी अधिकाऱ्यांना चकित केले. या प्रतीकात्मक कृत्याने महापालिका कार्यालयात घामाचे धारे वाहू लागले. “कालेवाडीतील सर्वस्यमान्य जनतेच्या प्रश्नांसाठी पुढील ५ वर्षे प्रशासनाला असाच घाम फोडणार!”, असल्याचे गापखे यावेळी म्हणाले.

प्रहार पक्षाकडून कष्टकरी कामगार व शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणूर रिंगणात उतरलेले संशय गायको हे काळेवाडी प्रभागक्र. २२मधून निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्यांना या वेशभूषेत आणि अनामत रक्कम चिल्लरमध्ये बधून अधिकारी सुरुवातीला गोंधळले, मात्र गायखे यांच्या ठाम भूमिकेमुळे शेवटी रक्कम स्वीकारावी लागली. हे प्रकरण सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असून, शहरातील कामगार वर्गातून त्यांना प्रचंड पाठिंबा मिळत आहे.

गायखे यांच्या उमेदवारीमुळे प्रहार पक्ष पिंपरी चिंचवड शहरात खाते उघडेल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. यावेळी बोलताना गावखे म्हणाले की, “प्रभाग क्र. २२ काळेवाडी मधील सर्वसामान्य नागरिकांना आन्ही पाणी, रस्ते, वीज यांसारख्या मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत आहे. त्यांच्या या समस्या सोडविण्यासा त्यांचा प्रतिनिधी म्हणून मी आज वेगात, व त्यांच्या पैशांत उभा राहिलो.