संवाददाता ब्रिजेश बडगुजर: टाटा मोटर्स फौंड्री, चिंचवड येथे फॅब्रिकेशन करत असताना पुष्पेंद्र कुमार (वय 26) या युवकाचा मोठ्या जॉबसखाली दबून मृत्यू झाला होता.याबाबत यशवंत भोसले व पत्रकार ब्रिजेश बडगुजर यांच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले.उपाध्यक्ष बनसोडे यांनी गंभीर दखल घेतली असून, कंपनीकडून फक्त सहा लाख रुपये दिल्याचा दावा फेटाळत, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी पुढील आर्थिक व शैक्षणिक मदतीबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती भोसले यांनी दिली.
टाटा मोटर्स फौंड्री,चिंचवड येथे झालेल्या अपघातात मृत्यूमुखी पडलेले कामगार पुष्पेंद्र कुमार यांच्या प्रकरणावर पत्रकार परिषद घेताना “राष्ट्रीय श्रमिक आघाड़ी” चे राष्ट्रीय अध्यक्ष,कामगार नेते श्री यशवंतभाऊ भोसले!
