संवाददाता ब्रिजेश बडगुजर:
पिंपरी चिंचवड न्यायालयात दि.२७/७/२०२४ रोजी राष्ट्रीय लोकन्यालय आयोजित करण्यात आले होते,त्यामध्ये उपस्थित न्यायाधिश श्रीमती चव्हाण,चौकट साहेब व आमुदी साहेब,सदर कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी ज्येष्ठ विधीज्ञ श्री सुशील मंचरकर यांनी भूषविले तसेच सदर कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणुन अँड संगिता परब यांचे मार्गदर्शन लाभले.
वक्ते न्यायमूर्ती अल आमोदी,अँड श्री सुशील मंचरकर,अँड सुहास पडवळ, सतीश गोर्डे,राजेश पुणेकर सदर कार्यक्रमात न्यायमूर्ती अल अमोदी यांनी राष्ट्रीय लोक न्यायालयात सर्वांनी सहभाग घ्यावा असे आव्हान केले.अँड पडवळ व गोरडे यांनी लोक न्यायालयाचे महत्त्व आणि भविष्यात त्याचे महत्त्व सांगितले.
तसेच अँड मंचरकर यांनी लोकन्यायलयाची संकल्पना व आज पर्यंत पिंपरी येथील लोकन्यायालयाचा इतिहास हा रामायण महाभारता पासुन श्रीकृष्ण व हनुमान यांनी शांती पुर्वक केलेले काम व ते प्रयत्न यशस्वी व अयशस्वी झाल्याने त्यांचे होणारे परिणाम समजावून सांगितले. लोकन्यायालयाचे संकल्पना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश श्री भगवते साहेब,ए एच अहमदी व रंगनाथ मिश्रा यांच्या योगदान बद्दल सांगितले.तसेच भविष्यात वाद तडजोड करून आपाआपसात होणारे फायदे सांगितले,तसेच लोकनायालयच्या स्थापने बद्दल महिती दिली व सर्वांना महिती दिली व भविष्यात लोक न्यायालयाच्या माध्यमातून प्रकरण मिटवण्याचे आवाहण केले.